esakal | माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न, ही तर दडपशाही : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

पश्चिम बंगालच्या निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे. ईशान्यकडील राज्य पेटली आहेत. देशात महागाई, बेरोजगारी असताना त्यावरून लक्ष विचलीत केलं जात आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.

माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न, ही तर दडपशाही : संजय राऊत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लहान पक्षांना अमिष दाखवून तर काहींवर दडपशाही करून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. मी चर्चेदरम्यान बोलत असताना माझा आवाज बंद करण्याचा प्रय़त्न करण्यात आला, माईक बंद करण्यात आला. मी संसदीय पक्षाचा नेता असूनही आवाज बंद केला. संसदेच्या सभागृहात आणीबाणी आणली असून, दडपशाही सुरू आहे. इंदिरा गांधींनी पण संसदेत अशी आणीबाणी आणली नाही, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळी भूमिका घेत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेतील मतदानावेळी सभात्याग केला. संजय राऊत यांनी काल राज्यसभेत चर्चेदरम्यान सरकारच्या अनेक भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले होते. 

कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील

संजय राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की पश्चिम बंगालच्या निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे. ईशान्यकडील राज्य पेटली आहेत. देशात महागाई, बेरोजगारी असताना त्यावरून लक्ष विचलीत केलं जात आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. ज्या शाळेत तुम्ही शिकला, तिथले आम्ही हेडमास्तर आहोत. आम्ही कोणाच्या दबावतंत्राला घाबरत नाही. आम्ही युपीएसोबत नाही. सदस्य नाही. महाराष्ट्राचं सरकार कोणत्या धार्मिक अधिष्ठानावर नव्हे तर समान किमान कार्यक्रमावर चालले आहे. इथे राष्ट्रीय प्रश्नांचा मुद्दा येत नाही, राज्यातल्या प्रश्नांवर सरकार चालत आहे.