esakal | संजय राऊत यांचे पुन्हा एकदा सूचक ट्विट; पाहा काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की राजकारणात अंतिम काही नसते, सगळे चालत असते. राऊत यांनी हे ट्विट नेमके कोणत्या कारणाने केले आहे, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेने भाजपच्या महत्वाकांक्षी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देत विधेयकाच्या बाजुने मतदान केले आहे. 

संजय राऊत यांचे पुन्हा एकदा सूचक ट्विट; पाहा काय?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभेत भाजप सरकारने मांडलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की राजकारणात अंतिम काही नसते, सगळे चालत असते. राऊत यांनी हे ट्विट नेमके कोणत्या कारणाने केले आहे, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेने भाजपच्या महत्वाकांक्षी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देत विधेयकाच्या बाजुने मतदान केले आहे. 

पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे

शिवसेनेने या विधेयकात दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राजनीती मे अंतिम कुछ नही होता, असे राऊत म्हणत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यात राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी दररोज ट्विट करत भाजपला लक्ष्य केले होते. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये वाद झाले होते. आता राऊत यांनी आज पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर