पंतप्रधानपदी मोदींऐवजी 'हा' नेता असेल, तरच सेना युतीला तयार..?

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी नाहीतर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे नाव समोर आल्यास शिवसेना-भाजप युती होण्याची शक्यता आहे.

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी नाहीतर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे नाव समोर आल्यास शिवसेना-भाजप युती होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्रिशंकू परिस्थितीत भाजपचे नेते नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील. अशा परिस्थितीत शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल, असे पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संकेत दिले आहेत. शिवसेनेसोबत युती होईल, असे फक्त भाजपला वाटते शिवसेनेला नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजनाने उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज (ता. 23) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौर बंगल्यावर त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. युतीत बेबनाव झाला असताना या दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हे दोन्ही नेते एकत्र आल्याने युती होणार की नाही या चर्चांना पुन्हा उधाण आले होते, पंरतु आज फडणवीस आणि उद्धव यांच्यात युतीबाबत कुठलेही बोलणे झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: shivsena rules out alliance with bjp but says will support if gadkari emerges as pm face