शिवसेना खासदार संजय राऊत अन् राकेश टिकैत यांची भेट

आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे.
politics
politicsesakal

देशात सध्या निवडणूकांचे वारे वाहत असून राजकीय नेतेमंडळी एकमेकांच्या भेठी घेण्यात व्यस्त आहेत. दरम्यान शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आप पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक याच्यांत आरोपप्रत्यारोपही पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे. याबाबतीत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.

politics
आता कच खाऊ नका; मराठी पाट्यांवनरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्याना सल्ला

यात ते म्हणतात, आज मुजफ्फरनगरमध्ये जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैच यांची भेट घेतली. यावेळी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्याविषयी बराच वेळ चर्चा केली. देशाचे राजकारण याविषयावरही चर्चा केली. दरम्यान, उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेस सुरु असणाऱ्या काही ज्वलंत विषयांवर बातचीत झाली. यावेळी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना नेहमी अग्रही भूमिका घेत राहिल असेही राऊत यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com