विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : आमदार शिवेंद्रसिंहराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendrasinharaje Bhosale

'मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी 100 टक्के खंबीरपणे उभे राहतील.'

विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना (Ajinkyatara Sugar Factory) आणि सूतगिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. (कै.) भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन या दोन्ही संस्थांचे काम प्रगतिपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून, सातारा तालुक्यातील सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election) निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील (कै.) अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा झाला. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बिनविरोध निवडून आलेले अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांच्यासह प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, रामराव लेंभे आदी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहकार पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: 'बारामतीकरांची सुपारी उचलून जिहे-कठापूर अडचणीत आणत असाल तर..'

Shivendrasinharaje Bhosale

Shivendrasinharaje Bhosale

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘गेल्या ५- ६ वर्षांत बँकेचा अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामकाज केले. सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. बँकेचा इतिहास पाहता राजकारण विरहित कामकाज झाले आहे. राज्य आणि देशात आपल्या बँकेचे नाव अग्रेसर आहे. बँकेची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी १०० टक्के खंबीरपणे उभे राहतील.’’

हेही वाचा: 'निवडणुकीत गृहराज्यमंत्र्यांकडून पैशाचा वापर'

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी आभार मानले. या वेळी सतीश चव्हाण, वनिता गोरे, किरण साबळे- पाटील, प्रतीक कदम, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, अरविंद जाधव, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, आशुतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, मिलिंद कदम, प्रकाश बडेकर, रामभाऊ जगदाळे, विक्रम पवार, उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, दादासाहेब बडदरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांत तुंबळ हाणामारी; वाहकानं नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

loading image
go to top