शासकीय शाळेतील माध्यान्ह भोजनात आढळले सापाचे पिल्लू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

येथील एका शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनातील पदार्थांमध्ये सापाचे पिल्लू आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे माध्यान्ह भोजनाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

फरिदाबाद (उत्तर प्रदेश) : येथील एका शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनातील पदार्थांमध्ये सापाचे पिल्लू आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे माध्यान्ह भोजनाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ेयेथील शासकीय मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. माध्यान्ह जेवण दिल्यानंतर काही जणांनी ते खाण्यास सुरुवात केली. दरम्यान काही विद्यार्थ्यांना उलटी झाली. शाळेचे प्राचार्य आणि काही शिक्षकांनी जेवणाची चव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना जेवणात सापाचे पिल्लू असल्याचे आढळून आले. त्यानंतर तातडीने सर्व विद्यार्थ्यांना जेवणापासून रोखण्यात आले. "नेहमी देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन शिळे असल्याचा वास येत असतो. मात्र सापाचे पिल्लू सापडण्याचा प्रकार भयंकर आहे', अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि भोजन पुरविणाऱ्या इस्कॉन फूड रिलिफ फाऊंडेशनला दिल्याची माहिती शाळेचे प्राचार्य ब्रज बिला यांनी दिली. हेच भोजन ज्या इतर शाळेत देण्यात आले होते, त्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही असाच अनुभव आला.

Web Title: UP Shocker : Snake found in mid-day meal at Govt school