
सिरोही : गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञान (Technology for Police) किती फायदेशीर ठरू शकतं याचं एक उदाहरण राजस्थानातील (Rajsthan News) सिरोही जिल्ह्यातून समोर आलं आहे. कन्ट्रोल रुममध्ये सीसीटीव्ही (Control room CCTV) तपासत असताना पोलिसांनी एक गंभीर गुन्हा घडण्यापासून रोखला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुकंही होत आहे. (shocking incident witnessed by Rajstan police while checking CCTV in control room)
राजस्थान पोलिसांतील कॉन्स्टेबल लाभू सिंह यांनी नेहमीप्रमाणं सीसीटीव्ही तपासत असताना एक संशयास्पद घटना दिसून आली. यामध्ये एक ५० वर्षीय व्यक्ती एका लहान मुलीला आपल्या मोटरसायकलवरुन घेऊन जात असताना दिसून आला. यानंतर पोलिसांनी त्या संशयीत व्यक्तीवर नजर ठेवली आणि गस्ती पथक त्याच्या मागावर लावलं. गस्ती पथक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर तो त्या अल्पवयीन मुलीसोबत असभ्य आणि अश्लील कृत्य करताना दिसून आला. यामुळं संबंधित पीडित मुलीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं.
पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर अल्पवयीन मुलीला आपल्या ताब्यात घेतलं आहे. यानंतर पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरुप सोपवण्यात आलं. तसेच या मुलीसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.