देशातील तब्बल एवढ्या राज्यांत होतेय दलितांची घुसमट; एनसीआरबीची धक्कादायक माहिती

पीटीआय
Saturday, 3 October 2020

हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचार आणि खून प्रकरणामुळे अवघा देश ढवळून निघाला असताना, महिला आणि शोषित घटकांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नऊ राज्यांमध्ये दलित अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली - हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचार आणि खून प्रकरणामुळे अवघा देश ढवळून निघाला असताना, महिला आणि शोषित घटकांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नऊ राज्यांमध्ये दलित अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशभरात महिलांवरील अत्याचार मोठ्याप्रमाणावर वाढले असून विविध ठिकाणी रोज ८८ बलात्कार होत असून यातील सतरा तरुणी या राजस्थानातील तर ९ उत्तरप्रदेशातील असतात असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीतून उघड झाले आहे.

कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी केरळने घेतला मोठा निर्णय

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणांवर फक्त आकडेच बदलले असून परिस्थिती मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे. महिलांप्रमाणेच दलित अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली असून  आज दिवसभर सोशल मीडियामध्ये ट्विटरवर DalitLivesMatter  हा ट्रेंड चर्चेमध्ये होता. देशातील नऊ राज्यांमध्ये दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण हे ८४ टक्के  एवढे असल्याचे आढळून आले आहे. 

हाथरस प्रकरणी जे झालं त्याने भाजपची प्रतिमा डागाळली- उमा भारती

विशेष म्हणजे याच राज्यांमध्ये दलितांचे प्रमाण हे ५४ टक्के एवढे आहे. दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये राजस्थान पहिल्या स्थानी असून मध्यप्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे.उत्तरप्रदेश, बिहार गुजरात (एक लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांचे प्रमाण) या राज्यांमध्येही दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. केरळ, ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये फारशी वेगळी स्थिती नसल्याचे दिसून येते.

कोरोना विषाणू हवेत 6 फूटांपेक्षा जास्त प्रवास करू शकतो का? नवीन संशोधन काय सांगतं

पंजाबमध्ये अत्याचार कमी
पंजाबमध्ये दलित अत्याचाराचे प्रमाण हे सर्वांत कमी आहे, लोकसंख्येचा विचार केला तर येथेही दलितांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून येते. मागील वर्षभरामध्ये येथे दलित अत्याचारप्रकरणी १६६ गुन्हे दाखल करण्यात आले हे प्रमाण १.९ टक्के एवढेच  आहे. जम्मू-काश्मीर, पश्‍चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्येही अत्याचाराचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking information NCRB infiltration Dalits so many states country