

Andhra Pradesh Temple Tragedy No Accountability Claimed After Stampede
Esakal
आंध्र प्रदेशातील काशीबुग्गी इथं व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित्त झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराचं बांधकाम सुरू असल्यानं भाविकांची गैरसोय झाल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय. तिरुपतीच्या धर्तीवर या मंदिराचं बांधकाम केलं आहे. ओडिशातील ९४ वर्षीय मुकुंद पांडा हे मंदिर उभारलंय. चार महिन्यांपूर्वीच हे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं होतं. दरम्यान, मंदिरात घडलेल्या दुर्घटनेची जबाबदारी घेण्यास मुकुंद पांडा यांनी नकार दिलाय. या घटनेसाठी कुणीच जबाबदार नाही. हा दैवी प्रकोप होता असं मुकुंद पांडा यांनी म्हटलं.