
चक्की नदीवरील ऐतिहासिक पूल मुसळधार पावसामुळे कोसळला, वाहतूक ठप्प.
स्थानिक प्रशासनाने पर्यायी मार्गांचा शोध आणि मदत कार्य सुरू केले.
अवैध उत्खनन आणि पावसामुळे पुलाच्या संरचनेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
Viral Video : हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जोडणारा ९० वर्षे जुना चक्की रेल्वे पूल काल मुसळधार पावसामुळे कोसळला ज्यामुळे या दोन्ही राज्यांमधील महत्त्वाचा दुवा खंडित झाला आहे. कांगडा जिल्ह्यातील चक्की नदीवर असलेला हा ८०० मीटर लांब पूल गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने आणि नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कमकुवत झाला होता. शनिवारी सकाळी पुलाचा एक पिलर आणि दोन स्पॅन अचानक कोसळले ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.