गुजरात गृहमंत्र्यांवर भिरकावले बूट

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

गांधीनगर: गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांच्यावर बूट भिरकावले जाण्याची घटना आज येथे घडली. विधानसभेच्या इमारतीसमोर ते पत्रकारांबरोबर बोलण्याच्या तयारीत असताना गोपाल इतालिया या व्यक्तीने "भ्रष्टाचार बंद करा', असे ओरडत जडेजा यांच्यावर बूट भिरकावले. मात्र, जडेजा माऱ्यातून बचावले. पोलिसांनी इतालियाला ताब्यात घेतले. तो मनोरुग्ण असून, सरकारी कर्मचारी असल्याचा त्याचा दावा असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजाच्या सुटीच्या वेळात ही घटना घडली. पत्रकारांबरोबर बोलण्यासाठी जडेजा बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर बूट भिरकावले गेले. इतालियाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळल्याचे गांधीनगर विभागाचे पोलिस महानिरीक्षक आर. बी. ब्रह्मभट्ट यांनी सांगितले. गोपाल इतालियाचे वय साधरणतः तीस वर्षांचे असून, तो अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका येथील एका सरकारी कार्यालयात कारकून आहे. त्याची चौकशी सुरू असून, त्यानंतर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे ब्रह्मभट्ट यांनी नमूद केले.

सरकारच्या हुकूमशाही आणि उर्मट वागणुकीच्या निषेधार्थ आपण हे कृत्य केल्याचा दावा इतालियाने केला आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि दारूबंदीच्या आव्हानांशी मुकाबला करण्याचे सरकारी धोरण आपल्याला पसंत नसल्याचे तो म्हणाला.

या घटनेचे खापर सत्तारूढ भाजपने विरोधी कॉंग्रेसवर फोडले आहे. निषेध करण्याचा कॉंग्रेसचा हा मार्ग अयोग्य असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी केली, तर बूट भिरकावणे आणि शाई फेकण्यापेक्षा नागरिकांनी निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करावा, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसतर्फे देण्यात आली.

Web Title: Shoes hurled at Gujarat Home Minister Pradipsinh Jadeja