'चिता'ने नऊ गोळ्या झेलूनही जिंकली लढाई !

CRPF commandant Chetan Kumar Cheetah
CRPF commandant Chetan Kumar Cheetah

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान नऊ गोळ्या लागल्यानंतर कोमात गेलेले केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कमांडर चेतन कुमार चिता हे दोन महिन्यानंतर शुद्धीवर आले असून, व्यवस्थित बोलू लागले आहेत. जीवन-मरणाच्या लढाईत ते जिंकले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील बंदीपूर जिल्ह्यातील हाजिन भागात दहशतवादी व जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये तीन जवान हुतात्मा तर एक दहशतवादी ठार झाला होता. यामध्ये पंचेचाळीस वर्षीय चिता यांनी नऊ गोळ्या झेलल्या होत्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. नऊ गोळ्यांपैकी काही गोळ्या डोक्यात घुसल्या होत्या. डावा डोळा फुटला होता. गंभीर जखमी झालेले व बेशुद्ध अवस्थेत त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ते कोमात गेले होते. सध्या ते कोमातून बाहेर आले असून, बोलू लागले आहेत. शरिराच्याही हालचाली करू लागले आहेत.

चिता यांना नऊ गोळ्या लागल्यानंतर उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन महिने ते कोमात होते. नुकतेच ते शुद्धीवर आले असून, बोलू लागले आहेत. काही दिवसांतच त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. दहशतवाद्यांच्या नऊ गोळ्या झेलल्यानंतर ते सुखरूप झाले आहेत, हा एक चमत्कारच आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.

'चिता यांनी नऊ गोळ्या झेलल्यानंतर गंभीर अवस्थेतून ते बाहेर आले आहेत. विशेष म्हणजे शरिराचा कोणताही भाग न गमावता ते व्यवस्थित झाले आहेत. खरोखरच हा एक चमत्कार आहे,' असे डॉ. अमित गुप्ता यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com