आचारसंहितेआधीच विकासकामे संपवा : नितीन गडकरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. नागपुरात अनेक विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या, परंतु अद्यापही बरीच कामे अपूर्णावस्थेत आहेत. मेट्रो रेल्वेसुद्धा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्‍यता नाही. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. परंतु, कामाचा वेग पाहता मेट्रोची शिटी वाजण्याची शक्‍यता कमीच आहे. निवडणूक आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लागू होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता लक्षात घेऊन गडकरींनी अधिकाऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत कामे आटोपण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपुरातील केळीबाग-जुना भंडारा रस्ता सहा पदरी करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत निविदा काढण्याचे निर्देश दिले. पारडी उड्डाण पुलाचे जमीन संपादन 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना गडकरींनी केली. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल तोडून तेथील दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय यशवंत स्टेडियमची पुनर्बांधणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक, बुधवार बाजारचे डिझाइन आदी कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Should complete development works before election code of Conduct says Nitin Gadkari