तुमच्यासाठी बांगड्या पाठवू का?

Jammu-Kashmir-Valley
Jammu-Kashmir-Valley

श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज (शनिवार) महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेनेही हा निर्णय स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र, शेजारील देश आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा मात्र चांगलाच जळफळाट झाला. 

कलम 370 काढून घेण्याच्या निर्णयास महिना उलटल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज काश्मीर खोऱ्यास भेट दिली. या पार्श्‍वभूमीवर डोवाल यांनी निवडक पत्रकारांना काश्‍मीरमधील सद्यःस्थितीची माहिती दिली. सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की, पलीकडे सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानचे कम्युनिकेशन टॉवर आहे. त्यावरून त्यांची चर्चा ऐकली आहे. यात ते म्हणतात, 'तुम्ही लोक काय तेथे करीत आहात, त्या ठिकाणी (काश्‍मीरमध्ये) सफरचंदांनी भरलेल्या ट्रकची वाहतूक कशी काय सुरू आहे. तुमच्यासाठी बांगड्या पाठवू का,' अशा शब्दांत सीमेपलीकडून दहशतवाद्यांना निर्देश दिले जात असल्याचे डोवाल म्हणाले.

काश्‍मिरी नागरिकांचे संरक्षण करणे, हे आमचे कर्तव्य असून यासाठी आणखी काही निर्बंध लागू करावे लागणार आहेत. पाकिस्तानकडे आता एकमेव शस्त्र राहिले आहे, ते म्हणजे दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्याचा प्रसार करणे. 

दहशतवाद्यांना बळ दिले जात असल्याबद्दल डोवाल यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. सीमेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत 230 दहशतवाद्यांची ओळख पटली असून, आपण कोणत्याही स्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे डोवाल यांनी नमूद केले. त्यांनी सोपोरच्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्याचे निर्देश दिले. राज्यातील बहुतांश नागरिक कलम 370 हटविण्याच्या निर्णयाच्या बाजूने असल्याचे डोवाल यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com