Asaduddin Owaisi : कावडीयांवर फुलांचा वर्षाव; मग...; असदुद्दीन ओवैसींनी उपस्थित केला प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi Latest marath News

कावडीयांवर फुलांचा वर्षाव; मग...; असदुद्दीन ओवैसींनी उपस्थित केला प्रश्न

नवी दिल्ली : कावडीयांसाठी वाहतूक वळवता येत असेल तर नमाज अदा करायला काय हरकत आहे. आम्हालाही नमाज अदा करण्याची परवानगी द्या. कलम २५ नुसार प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. लुलू मॉलमध्ये नमाजवर कारवाई झाली. नमाज अदा केल्याने कोणते नुकसान होते, असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेशातील कावडीयांवर पुष्पवृष्टी व प्रशासनाकडून स्वागत करण्यावर केला आहे. (Asaduddin Owaisi Latest marath News)

अशाप्रकारे तुम्ही एका समुदायासोबत भेदभाव करीत आहात. जे संविधानाच्या विरोधात आहे. यावर भाजप कलम २५ चा संदर्भ देईल. नमाज अदा करण्यात कोणाला अडचण आहे. त्यांचे काय नुकसान आहे हे देखील सांगा. तुमचा नारा ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ असेल तर हा प्रकार त्याप्रमाणे नाही, असेही ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

हेही वाचा: Sanjay Singh Suspended : आपचे खासदार संजय सिंह राज्यसभेतून निलंबित

पोलिसांनी कावडीयांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. झेंडे लावून अभिवादन केले. त्यांच्या पायाला लोशन लावले आणि त्यांच्याशी सौजन्याने वागले. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने प्रवासी मार्गांवर मांसावर बंदी घातली आहे. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव (shower of flowers) होत असेल तर किमान आमच्या घरात घुसू नका. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. त्यात कोणत्याही धर्माविषयी द्वेष किंवा प्रेमाबद्दल बोललेले नाही, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

देशाच्या सौहार्दाला बाधा आणणारी भाषा बंद करा

असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असदुद्दीन ओवैसी सतत देशविरोधी बोलतात. कावडीयांचे स्वागत ही भारताची परंपरा आहे. यात्रेकरूंची सेवा करण्याची परंपरा आहे. ज्यांना सेवा करण्याचे भाग्य मिळते तेच त्याचा आनंद अनुभवू शकतात. देशाच्या सौहार्दाला बाधा आणणारी भाषा बंद करावी. व्होट बँक निर्माण व्हावी हा एक सूत्री अजेंडा ते पाळत आहे. ही परंपरा कोणाच्याही विधानांनी थांबवता येणार नाही, असे मौर्य म्हणाले.

Web Title: Shower Of Flowers Asaduddin Owaisi Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top