

Shraddha Dubey
Esakal
व्यावसायिक शिवा शर्मा याच्या मृत्यू प्रकरणी फरार असलेली मॉडेल श्रद्धा दुबे हिच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर आणि माध्यमांतून प्रसारीत झाल्यानंतर पोलीस दलातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अवघ्या २४ तासात एका पाठोपाठ तीन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक विक्रम सिंह यांना हटवण्यात आलं. रात्री डीसीपी विक्रांत वीर यांची उचलबांगडी झाली तर सोमवारी सकाळी एसीपी रजनीश वर्मा यांनाही हटवण्यात आलं.