Shraddha Murder Case : आफताबची नार्को चाचणी संपली

श्रद्धा हत्या प्रकरणः आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
Shraddha Murder Case
Shraddha Murder Case

नवी दिल्ली : मुंबईच्या श्रद्धा हत्याप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पुनावाला याने नार्को चाचणीत हत्येची कबुली दिली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणताही ठोस पुरावा किंवा साक्षीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे नार्को चाचणीतील कबुली महत्त्वाची मानली जात आहे. पॉलिग्राफ चाचणीतही आफताबने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. या आधारावर पोलिसांकडून तपासणी आणि चौकशी केली जात आहे. (Aftab Poonawalla narco test)

आफताबची आज नार्को चाचणी संपली. पॉलिग्राफ चाचणीनंतर नार्को चाचणीतही त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे कपडे, मोबाईल कोठे फेकले, याची माहितीही आफताबने दिल्याचे गुप्ता म्हणाले. दिल्ली पोलिस आज सकाळी ८.४० च्या सुमारास आरोपी आफताबला रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घेऊन गेले. नार्को चाचणी करण्यापूर्वी त्याची सामान्य तपासणी करण्यात आली.

त्यानंतर दहा वाजता नार्को चाचणीला सुरवात झाली आणि दुपारी बाराच्या आसपास चाचणी संपली. रुग्णालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आफताबने प्रश्‍नांची उत्तरे इंग्रजीतून दिली. चाचणीदरम्यान मानसोपचारतज्ञ, फोटेा तज्ज्ञ आणि रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते. चौकशीच्या वेळी आफताब हा ठामपणे उत्तरे देत होता आणि त्याने बहुतांश प्रश्‍नांची भरभर उत्तरे दिली, असे सूत्राने सांगितले. दरम्यान, आफताबला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे काही अवयय दिल्लीच्या मेहरौली फ्लॅटमध्ये असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कबुली पुरेशी नाही

श्रद्धा हत्येप्रकरणी आरोपी आफताब पुनावाला याने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी त्याला कायदेशीर वैधता नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. न्यायालयात कबुली देताना आफताबने अनेक अटींची पूर्तता केली नाही, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर.एस. सोंधी यांनी नार्को चाचणी आणि पॉलिग्राफ चाचणीला निरुपयोगी आणि वेळेचा अपव्यय असल्याचे म्हटले आहे. कारण यास कोणतीही कायदेशीर वैधता नाही. युवतीची हत्या केल्यानंतर त्याने केलेले कृत्य हे पुरावे नष्ट करण्यासाठीच होते, असे सोंधी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com