Shraddha Murder Case : असंवेदनशील! आफताबच्या नावाने फेसबुक अकाऊंट; मुलींशी करतोय फ्लर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : असंवेदनशील! आफताबच्या नावाने फेसबुक अकाऊंट; मुलींशी करतोय फ्लर्ट

Shraddha Murder Case : असंवेदनशील! आफताबच्या नावाने फेसबुक अकाऊंट; मुलींशी करतोय फ्लर्ट

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने सगळा देश हादरला आहे. या प्रकरणी आरोपी आफताब अमीन पुनावाला याची चौकशी सुरू आहे. यातून तो श्रद्धाच्या खुनाबद्दल अनेक खळबळजनक खुलासे करत आहे. अशातच आता आणखी एक असंवेदनशील गोष्ट घडत आहे.

सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकवर आता आफताबच्या नावाने एक अकाऊंटही सुरू करण्यात आलं आहे. या अकाऊंटला प्रोफाईल फोटो म्हणून आफताबचा फोटो वापरण्यात आला आहे. तर कव्हर फोटो म्हणून श्रद्धा आणि आफताब यांचा फोटो वापरण्यात आला आहे.

हेही वाचा: Shraddha Murder Case: 'Aftabला फाशीची शिक्षा अन् त्याच्या घरच्यांनाही कठोर शिक्षा व्हावी'; श्रद्धाच्या वडिलांची मागणी

या सोशल मीडिया प्रोफाईलचे ६१३ फ्रेंड्सही आहेत. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथून असल्याचं या प्रोफाईलमध्ये म्हटलं आहे. या प्रोफाईलवरुन दोन पोस्टही करण्यात आलेल्या आहेत. तसंच अन्वी वर्मा या तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची अपडेटही देण्यात आली आहे.

हेही वाचा: Shraddha Murder Case : निर्भया-हाथरस बलात्कार पीडितेचा आवाज बनणारीच देणार श्रद्धालाही 'न्याय'

अशा प्रकारे आफताबच्या नावाने अकाऊंट सुरू करणे, त्यावरुन पोस्ट करणे हे अत्यंत असंवेदनशीलपणाचं असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. तसंच आफताबच्या क्रूरकृत्याचं कोणत्याही मार्गाने समर्थन नको, अशी भावनाही नेटकऱ्यांमधून उमटत आहे. दरम्यान., या आफताबच्या पोस्टवर त्याच्या मित्रयादीतल्या काही जणांनी श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी कमेंट्सही केल्या आहेत.