Shraddha Murder Case : निर्भया-हाथरस बलात्कार पीडितेचा आवाज बनणारीच देणार श्रद्धालाही 'न्याय' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : निर्भया-हाथरस बलात्कार पीडितेचा आवाज बनणारीच देणार श्रद्धालाही 'न्याय'

Shraddha Murder Case : निर्भया-हाथरस बलात्कार पीडितेचा आवाज बनणारीच देणार श्रद्धालाही 'न्याय'

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सगळा देश हादरून गेला आहे. श्रद्धाच्या खुनाप्रकरणी आरोपी आफताब अमीन पुनावालाची सध्या दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, श्रद्धाच्या वडिलांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी श्रद्धा ची बाजू मांडणाऱ्या वकिलांविषयी माहिती दिली आहे.

हेही वाचा: Shraddha Murder Case : ..नाहीतर माझी मुलगी वाचली असती; वसई पोलिसांवर श्रद्धाच्या वडिलांचा आरोप

कोण आहेत सीमा कुशावह?

अॅड. सीमा कुशावह या सर्वोच्च न्यायालयातल्या वकील आहेत. त्या निर्भया ज्योती ट्रस्टच्या संस्थापिकाही आहेत. बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली आहे. त्यांनी निर्भया आणि हथरस बलात्कार प्रकरणातल्या पीडितांची बाजू न्यायालयात मांडली आहे. २०१२ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण निर्भया प्रकरण म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा: Shraddha Murder Case: श्रद्धाच्या वडिलांनी मांडला धर्म जागृतीचा मुद्दा; मुलांच्या वयावरही बोलले

तर हथरसमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये एका १९ वर्षीय दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमधल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सीमा कुशावह यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये सीमा यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला.