Shraddha Murder Case : नार्को टेस्ट नव्हे पॉलिग्राफ चाचणी; आफताबच्या गुन्ह्याची कबुली घेणारी टेस्ट कशी होते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case : नार्को टेस्ट नव्हे पॉलिग्राफ चाचणी; आफताबच्या गुन्ह्याची कबुली घेणारी टेस्ट कशी होते?

सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या केली आणि देशभरात एकच आक्रोश उठला.

सध्या आरोपी आफताब या प्रकरणात नवनव्या गुन्ह्यांची गोष्टींची कबूली देत आहे पण अशात आफताब पोलिसांना कितपत खरं सांगतोय, यावर संशंय घेतला जात आहे. त्यामुळे सुरवातीला त्याची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचं बोललं जात होतं पण पोलिसांनी त्या अगोदर पॉलिग्राफ टेस्ट करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आता आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते? चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?

पॉलिग्राफ टेस्ट सत्य जाणून घेण्याची एक टेस्ट आहे. शारीरिक हालचालीतून व्यक्ती खरं बोलतो की खोटं, हे या टेस्टमधून कळतं. मात्र ही टेस्ट शंभर टक्के खरी ठरणार, हे सांगणे कठीण आहे. पहिल्यांदा पॉलिग्राफ टेस्ट १९२१ साली अमेरिकेत करण्यात आली होती.

हेही वाचा: Shraddha Murder Case: अफताबची आज नार्को टेस्ट नाहीच! अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते?

  • ही टेस्ट करण्यापूर्वी व्यक्तीची मेडीकल टेस्ट केली जाते.

  • पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले असतात.

  • व्यक्तीला सुरवातीला सामान्य प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गुन्ह्यासंदर्भात प्रश्न विचारले जातात.

  • यादरम्यान व्यक्ती जेव्हा उत्तर देतो तेव्हा मशिनच्या स्क्रीनवर त्याच्या हार्टचे ठोके, ब्लड प्रेशर, नाडी यांचं निरीक्षण नोंदवलं जातं.

  • पूर्वी केलेली मेडीकल टेस्ट आणि या टेस्ट दरम्यान नोंदवण्यात आलेलं निरीक्षण यातला फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

हेही वाचा: Shraddha Walker Murder Case : चार दिवसात १३ जणांचे जबाब  

नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये काय फरक आहे?

या नार्को टेस्टमध्ये आरोपीला काही औषधी दिली जातात, ज्यामुळे त्याचा ब्रेन सुस्त होतो ज्यामुळे आरोपीचे फार बुद्धीने विचार करण्याची क्षमता कमी होते आणि तो खरं बोलायला लागतो. पण प्रत्येकवेळी आरोपी नार्को टेस्टमध्ये खरं बोलेल, याची शक्यता नसते. कधी कधी ही नार्को टेस्ट फेल सुद्धा होऊ शकते.

नार्को टेस्टमध्ये आरोपीला “ट्रुथ ड्रग” नावाचे औषध किंवा “सोडियम पेंटोथल किंवा सोडियम अमाईटल”चे इंजेक्शन दिले जाते. यामुळे आरोपीचा ब्रेन सुस्त होतो. आरोपीची बौद्धीक क्षमता दूर होते.

तर पॉलिग्राफ टेस्टमध्ये मशीनीद्वारे प्रश्नाचे उत्तर देताना आरोपीचा ब्लड प्रेशर, नाडीचे आणि हार्टचे ठोके यातील बदल नोंदवले जातात. त्यावरून व्यक्ती कितपत खरं बोलतोय, हे ठरवलं जातं.