Balaji Tambe : श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर

Dr Balaji Tambe
Dr Balaji TambeSakal

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe) यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. (Balaji Tambe: Shri Guru Dr. Posthumous Padma Shri Kitab announced to Balaji Tambe)

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलं होतं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं पुण्यात निधन झालं. श्रीगुरु बालाजी तांबे यांनी ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुरवणीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जागृती केली. त्यातून त्यांनी विविध विषयांवर शेकडो लेख लिहिले. लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचं मोठे योगदान होतं.

Dr Balaji Tambe
असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

श्रीगुरु तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच, त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादीत न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले.

Dr Balaji Tambe
शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण, सुलोचना चव्हाण पद्मश्रीच्या मानकरी

लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्या निमित्ताने राजकीय, अभिनेते, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ल्यात येत होते. ‘सकाळ’च्या ‘साम’ वाहिनीवर श्रीमत भगवद्त गीतेचे निरूपण ते करत होते. त्याला मोठा प्रेक्षक वर्ग होता. तसेच, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com