
नवी दिल्ली : ‘‘शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासातून अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली असून, भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे; भविष्यात भारतातील अंतराळवीर हा भारतीय बनावटीच्या अवकाशयानातूनच प्रवास करून येईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.