पाकिस्तानात रचला बुखारींच्या हत्येचा कट

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

ज्येष्ठ पत्रकार सुजात बुखारींच्या हत्येबाबत नवी माहिती समोर आली असून, त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचण्यात आल्याचे जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले. 

श्रीनगर : ज्येष्ठ पत्रकार सुजात बुखारींच्या हत्येबाबत नवी माहिती समोर आली असून, त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचण्यात आल्याचे जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या हत्येप्रकरणातील चार संशयितांचे फोटोही जारी केले आहेत. 

'रायझिंग काश्मीर'चे मुख्य संपादक असलेले 48 वर्षीय सुजात बुखारी यांची 14 जूनला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेल्या बुखारींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बुखारींचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांचाही यामध्ये मृत्यू झाला होता. बुखारींच्या हत्येनंतर याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) पोलिस महासंचालकांकडे देण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीने यातील आरोपींना अटक केली.

त्यानंतर आता लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने बुखारींच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचल्याचे जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. पानी यांनी सांगितले. 

Web Title: Shujaat Bukharis murder was planned in Pakistan says Jammu Kashmir Police