मोदींच्या मिमिक्रीने फेमस झालेल्या श्याम रंगीलाची 'आप'मध्ये एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या मिमिक्रीने फेमस झालेल्या श्याम रंगीलाची 'आप'मध्ये एंट्री

श्याम रंगीलाने 'आप'मध्ये प्रवेश केल्यानंतर अरविंद केजरीवाल, दिल्ली सरकारच्या कामांचे कौतुक केले

मोदींच्या मिमिक्रीने फेमस झालेल्या श्याम रंगीलाची 'आप'मध्ये एंट्री

पंतप्रधान नरेंद्री मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाजातील बारकाव्यांसह हुबेहुब नक्कल करणारा कलाकार श्याम रंगीला यांने आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री करणारा स्टँडअप कॉमेडियन श्याम रंगीला याने अरविंद केजरीवाल यांच्या सोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. राजस्थानमधील 'आप'चे प्रभारी विनय मिश्रा यांच्या उपस्थितीत श्याम रंगीलाने (Shyam Rangeela) आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाता चर्चा सुरु झाल्या आहेत.

यांसदर्भात आम आदमी पक्षाने ट्विट करुन माहिती दिली आहे. श्याम रंगीला याने पक्षात प्रवेश केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात घोषणा करण्यात आली. राजस्थानमधील प्रसिद्ध विनोदवीर श्याम रंगीला यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. श्याम रंगीला जे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात, ते आता आपसोबत मिळून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी काम करतील, असे या ट्विटमध्ये म्हटले होते.

हेही वाचा: राज ठाकरेंना दुसरा झटका! बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी

श्याम रंगीला याने 'आप'मध्ये प्रवेश केल्यानंतर अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारच्या कामांचे कौतुक केले. मी आजपर्यंत 'आप' सोडून असा एकही राजकीय पक्ष बघितला नाही की, जो माझे काम पसंत न पडल्यास पुढच्यावेळी मला मतदान करु नका, असे सांगतो. मी आपच्या कामगिरीमुळे प्रभावित होतो. त्यामुळेच मी आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे श्याम रंगील याने म्हटले. मला पक्षात तुर्तास कोणतेही पद देण्यात आलेले नाही. सध्या मला स्वतंत्रपणे काम करण्यास सांगण्यात आले आहे, असेही श्याम रंगीला याने स्पष्ट केले.

श्याम रंगीला कोण आहे?

मोदींच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लॉकडाऊनच्या काळात श्याम रंगीला याने मोदी सरकारच्या धोरणांवर विनोदी पद्धतीने टीका केली होती. तसेच देशातील इंधनाचे दर गगनाला भिडल्यानंतर श्याम रंगीला याने भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर केलेला एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचा: वैष्णोदेवीचे चित्र असलेलं नाणं असेल तर व्हाल 10 लाखांचे मालक; जाणून घ्या

Web Title: Shyamlal Rangeela Mimicry Artist Join Aam Aadmi Party Prime Minister Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top