सुरीने ज्यूस कापला तर हातोड्याने अंडे फोडले; भारतीय जवानांची झुंज(व्हिडिओ)

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जून 2019

- थंडीत जवान करत असलेल्या संंघर्षाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
- सियाचीनमधील भारतीय सैनिकांचा व्हिडीओ
- सियाचीनमधलं तामनान 50 डिग्रीपर्यंत घसरलं
- अशा परिस्थितीत भारतीय जवानांची झुंज

सियाचीनः भारतीय जवान कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण करत असातात. सध्या याचीच एक प्रचिती देणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. जगातील सर्वात उंच ठिकाण आणि सर्वात कठीण युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील भारतीय सैनिकांचा हा व्हिडीओ आहे. बर्फाने व्यापलेल्या या प्रदेशात हवामान कधी मृत्यूचं कारण बनेल सांगता येत नाही. सियाचीनमधलं तामनान 50 डिग्रीपर्यंत घसरलं असून अशा परिस्थितीत भारतीय जवान सियाचीनध्ये झुंज देत आहेत.

अतिशय थंड हवेमुळे हाडं गोठणारी थंडी सियाचीनमध्ये आहे. अशावेळी खाण्या-पिण्याचे पदार्थ तोंडात जाण्यापूर्वीच गोठलेले असतात. इथलं वातावरण इतकं गोठलं आहे की, जवानांना अंडी चक्क हातोड्याने फोडावी लागत आहे. भारतीय जवान बटाटे, टोमॅटो, अंडी गोठल्याने ती हातोड्याने फोडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. स्वत: जवानांनीच हा शूट करुन परिस्थितीचं वर्णन केलं आहे. या व्हिडीओमध्ये एक जवान अंडी, टोमॅटो, बटाटे हातोड्याने फोडताना दिसतो. शिवाय ज्यूसचं पाकिटही गोठल्यामुळे, ते चाकूने कापावं लागत असल्याचे दिसत आहे.
 

संघर्षपूर्ण वातावरणात हे सर्व पदार्थ खाण्यायोग्य करण्यातच जास्त मेहनत होते. अशा परिस्थितीतही न झुकता, न डगमगता भारतीय जवान सीमेचं रक्षण समर्थपणे करत असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siachen where hammers break eggs soldiers video goes viral