येडियुराप्पांचे पंख छाटण्यासाठी कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्री 

येडियुराप्पांचे पंख छाटण्यासाठी कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्री 

बेळगाव - पक्षश्रेष्ठींनी बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फारसे स्वारस्य दाखवीत नव्हते. निवडणुकीला सामोर जाण्याची इच्छा होती. मात्र, येडियुराप्पा यांना काही करून मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री त्यांना बनविले. आता त्यांचे पंख छाटण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी तिघांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केल्याची टीका माजी मुख्यंमत्री सिध्दरामय्या यांनी केली आहे. 

सिध्दरामय्या आजपासून (ता. 27) दोन दिवस पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. बागलकोट, जमखंडीसह बेळगावातील पुराच्या पाहणीला सुरवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली. 

सिध्दरामय्या म्हणाले, उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक पद नाही. शिवाय उपमुख्यमंत्र्यांना विशेष अधिकार नाही. येडियुराप्पा यांना बांधून ठेवण्यासाठी तीन उपमुख्यमंत्रीपदांची सृष्टी केली आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा तिघांची उपमुख्यंमत्री म्हणून निवड करून मुख्यंमत्री येडियुराप्पा यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. खातेवाटपावरून सरकारमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. स्थिर सरकार देण्याची हमी देत सत्तेत आलेले भाजप सरकार कधीही कोसळू शकते. पण, सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. जगदीश शेट्टर मुख्यंमत्री होते. के. एस. ईश्‍वराप्पा, आर. अशोकही माजी उपमुख्यमंत्री होते. तिघांना डावलले असून, इतरांना उपमुख्यमंत्री बनविले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत लक्ष्मण सवदी यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. गोविंद कारजोळ यांना उपमुख्यमंत्री बढती देण्यात आली आहे. कारजोळ पूर्वी आमच्यासोबत होते. या स्वरुपाच्या नेत्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी अंतर्गत वादाला कारणीभूत ठरेल, असे सिध्दरामय्या यांनी सांगितले. 

ट्‌विटरवर सिध्दरामय्यांचा चिमटा 
विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शपथसाठी तीन दिवस, मंत्रीपद विस्तारासाठी 26 दिवस, खाते वाटपासाठी 6 दिवस, आता भिन्नमत मिटविण्यासाठी आणखी किती दिवस हवेत? या साऱ्या घडामोडीत तुमचे सरकार टेक ऑफ घेऊ शकेल का? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी ट्विट्‍रवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com