Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Siddaramaiah retirement rumours rise after Yathindra’s statement : राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यतिंद्र यांचे विधान एक विचारपूर्वक खेळलेली राजकीय चाल आहे.
Siddaramaiah
Siddaramaiahsakal
Updated on

Yathindra Siddaramaiah’s recent statement : कर्नाटकात मागील काही दिवसांत राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. या दरम्यान, नेतृत्व बदलाच्या चर्चांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांचे मोठं विधान समोर आलं आहे. त्यांनी म्हटलय, की ते(सिद्धरामय्या) आपल्या राजकीय जीवनाच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यांना आपले कॅबिनेट सहकारी सतीश जारकीहोळी यांचे मार्गदर्शक बनायला हवे.

याआधीही सिद्धरामय्या यांना पुढे येत त्या बातम्यांचे खंडण करावे लागले होते, की ते उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासाठी मुख्यंत्रिपद सोडतील. त्याचवेळी सिद्धरामय्या यांनी मीडियासमोर हे देखील स्पष्ट केले होते की, मी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्री पदावर राहील.

पक्षाने नेतृत्व बदलाला नकार दिला असला तरी, काँग्रेसमध्ये दोन वेगळे गट आहेत. एक गट सिद्धरामय्या यांना पाठिंबा देत आहे आणि दुसरा शिवकुमार यांना. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी सिद्धरामय्या गटाशी ठामपणे जुळलेले दिसतात.

Siddaramaiah
Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

त्यामुळे सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांनी बुधवारी सांगितले की, मुख्यमंत्री त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत आणि त्यांनी जारकीहोळीसारख्या व्यक्तीला मार्गदर्शन करावे, असे सुचवले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यतिंद्र यांचे विधान एक विचारपूर्वक खेळलेली राजकीय चाल आहे. त्यांचा उद्देश शिवकुमार आणि त्यांच्या समर्थकांना असा संदेश देणे आहे की सत्ता सिद्धरामय्या गटाकडेच राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com