कर्नाटकातील सरकार स्थिर : सिद्धरामय्या 

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांच्या व्हायरल झालेल्या दोन व्हिडीओवरून चर्चेस उधाण आले होते, त्याच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले कि, ते सरकारवर नाराज नाहीत. शुक्रवारी बंगळूरमध्ये झालेल्या काँग्रेस पक्ष समन्वय समितीच्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. 

बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार स्थिर असून ते कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगत सरकारच्या स्थैर्याबाबत निर्माण झालेल्या चर्चेस पूर्णविराम दिला. 

काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांच्या व्हायरल झालेल्या दोन व्हिडीओवरून चर्चेस उधाण आले होते, त्याच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले कि, ते सरकारवर नाराज नाहीत. शुक्रवारी बंगळूरमध्ये झालेल्या काँग्रेस पक्ष समन्वय समितीच्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. 

ते म्हणाले कि, मी नाराज आहे असे कोण म्हणाले? आणि मी केलेले वक्तव्य कोणत्या संदर्भात आहे याबाबत आपल्याला कल्पना नाही, असे स्पष्ट करत काँग्रेस पक्षातर्फे प्रकरणावर पडदा घालण्यात आला. तसेच ते पुढे म्हणाले कि, एखादे आकस्मितपणे बोललेले वक्तव्य कोणत्याही संदर्भाविना रेकॉर्ड करून प्रसारित करणे हे नैतिकतेला धरून नाही. त्या वक्तव्याचा संदर्भ कोणालाही माहिती नाही. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून सिद्धरामय्या हे एच. डी. कुमारस्वामी सादर करत असलेल्या नवीन अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसून आले होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये बजेट सादर केले होते. तेच पुढे चालू ठेवावे अशी त्यांची मागणी असल्याचे दिसत होते. भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीचे सरकार स्थापन केले असून त्यास कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. 
काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षातील नेत्यांनी मतभेत नसल्याचे सांगितले. तसेच कुमारस्वामी यांनी सरकारला धोका नसून अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Siddaramaiah Says No Doubt About Stability Of Congress JDS Government