संकटमोचकच ठरताहेत काँग्रेससाठी संकट

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार अस्तित्वात येऊन काही दिवस झाले असताना आता काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि जेडीएसमध्ये अर्थसंकल्पावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेससाठी एकेकाळी तारणहार होते. परंतु, तेच आता पक्षासाठी आणि सरकारसाठी कर्नाटकमध्ये संकट बनत आहेत. त्यांनी अर्थसंकल्पावरुन उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. तर, सिद्धरामय्या हे सर्व जाणीवपूर्वक करत असल्याची अंतर्गत चर्चा आहे.

बंगळूरु - कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार अस्तित्वात येऊन काही दिवस झाले असताना आता काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि जेडीएसमध्ये अर्थसंकल्पावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेससाठी एकेकाळी तारणहार होते. परंतु, तेच आता पक्षासाठी आणि सरकारसाठी कर्नाटकमध्ये संकट बनत आहेत. त्यांनी अर्थसंकल्पावरुन उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. तर, सिद्धरामय्या हे सर्व जाणीवपूर्वक करत असल्याची अंतर्गत चर्चा आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकानंतर सिद्धरामय्या यांची नाराजी स्पष्ट जाणवत आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर टीका सातत्याने करताना दिसत आहेत. त्याचबरोबर, त्यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पावरील आक्षेपामुळे जनता दल (एस)च्या आमदारांमध्ये संताप दिसून येत आहे. त्याचबरोबर काँग्रेसचेही काही नेते सिद्धरामय्या यांच्यावर नाराज आहेत.

काँग्रेसच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, सिद्धरामय्या काँग्रेस आघाडीचे गटनेते असल्याने ते सगळ्यांना समजावून घेतील अशी अपेक्षा होती. पंरतु, दुर्दैव हे की, तेच सरकारसाठी त्रासदायक ठरत आहेत. सिद्धरामय्या यांचा अर्थसंकल्पाला विरोध करणे हे चुकीचे आहे. कुमारस्वामींच्या अर्थसंकल्पाला काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचा विरोध नाही तर सिद्धरामय्या हे अर्थसंकल्पाला का विरोध करत नाहीत हे न समजण्यासारखे आहे, असेही यावेळी काँग्रेस नेत्यानी स्पष्ट केले. अर्थसंकल्पातील चुकीचे मुद्दे सिद्धरामय्या यांनी लोकांसमोर घेऊन जाण्याआधी ते सभागृहात मांडायला हवे होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. 

Web Title: siddharammaya oppose state new budget by cm kumaraswamy