नवज्योतसिंह सिद्धू म्हणजे संघाची 'टीम बी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'टीम बी‘ असल्यासारखे वागत असल्याची टीका आम आदमी पक्षाने आज (शुक्रवार) केली आहे. 

सिद्धू यांनी आवाज-ए-पंजाब नावाचा नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पक्ष पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही म्हटले आहे. यावेळी केजरीवाल यांच्यावर टीका करताना सिद्धू त्यांना केवळ "एस मॅन‘ (हो ला हो मिळविणारे) हवे असल्याचे म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना आम आदमी पक्षाचे नेते जर्नील सिंह म्हणाले की, "नवज्योतसिंह सिद्धू हे पंजाबमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची "टीम बी‘ म्हणून खेळ खेळत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की शिरोमणी अकाली दल ाणि भारतीय जनता पक्षाची युती गेल्या दहा वर्षांपासून पंजाबमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पंजाबमधील सध्याच्या परिस्थितीतीला तितकाच जबाबदार आहे. पंजाबमधील भाजप आणि एसएडीच्या बचावासाठी सिद्धू हे केजरीवाल यांना लक्ष्य करण्यासाठी बादल सरकारच्या विरुद्ध उभे आहेत.‘

Web Title: Sidhu is 'B' team of RSS, says AAP