नवज्योतसिंग सिद्धू आणि राहुल गांधी यांची भेट 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (मंगळवार) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील उपलब्ध झालेला नाही. 

दरम्यान, पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू वातावरण तापू लागले आहे. सिद्धू यांच्या पत्नी नुकत्याच अकाली दलाचे माजी नेते परगटसिंग यांच्याबरोबर कॉंग्रसमध्ये सामील झाल्या. त्यावेळी नवज्योतसिंग सिद्धू देखील पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. परंतु, त्यावर कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही

Web Title: Sidhu meets Rahul Gandhi