दिल्लीचे दाऊद: सिद्धूच्या मारेकऱ्याला बदल्याची धमकी देणारी बवाना गँग काय आहे?

दिल्लीची दाऊद गँग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बवाना गँगची कुंडली जाणून घ्या.
Siddhu Moosewala
Siddhu MoosewalaSakal

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची पंजाबमध्ये भर रस्त्यात गोळ्या झाडून सिनेस्टाईल हत्या झाली आणि बवाना गँग हे नाव वेशीवर आलं. सिद्धूची हत्या झाली की लगेच बदला घेण्यासाठी या गँगने विडा उचललाय. सिद्धू दिल से हमारा भाई था, २ दिवसांच्या आत बदला घेतला जाईल अशी दवंडीच जणू या गँगने दिली आहे. 'नीरज बवाना दिल्ली एनसीआर' या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट टाकण्यात आली आणि पंजाबमध्ये वातावरण टाईट झालंय. पण जाहीरपणे धमकी देणाऱ्या या नीरज बवाना गँग विषयी आपल्याला माहितीये का?

बवाना गँग. पंजाबमध्ये कुप्रसिद्ध असलेली गुंडांची पार्टी. नीरज बवाना हा या गँगचा लीडर. दिल्लीतल्या टॉप गँगस्टारपैकी एक. पण सध्या तिहार जेलची हवा खात असलेल्या नीरजचे जेलच्या बाहेरही खूप फॅन आहेत. तसं पाहिलं तर कोणत्याही कुप्रसिद्ध गँगस्टारचे टोळके असतात तसं याच्याही समर्थकांची टोळी आहे. 'नीरज बवाना दिल्ली एनसीआर' या नावाने या टोळीचे फेसबुक अकाऊंट. या अकाऊंटवरून धमकीची पोस्ट करण्यात आल्याने ही गँग चर्चेत आहे.

नीरज बवाना
नीरज बवानासकाळ

कॅनडामधील गँगस्टार गोल्डी बराड आणि जेलमध्ये बंद असलेला डॉन लॉरेंज बिश्नोई यांचा सिद्धूच्या हत्येमागे हात असल्याचं सांगितलं जातंय. कारण सिद्धूच्या हत्येनंतर गोल्डीने पोस्ट करत या हत्येची जबाबदारी घेतली होती. अकाली दलाचे नेते विक्रमजित सिंग मिद्दुखेडा यांच्या हत्येला सिद्धू जबाबदार होता असं गोल्डी म्हणाला होता. बिश्नोई आणि गोल्डी हे दोन्ही गँगस्टार सध्या जेलमध्ये असले तरी त्यांचा उत्तर भारतातील राज्यांत दबदबा कायम आहे. गोल्डी आणि बिश्नोई गँग आणि नीरज बवाना गँगचे तसे जुने वैर.

नीरज सहरावत नावाचा गुंड दिल्लीच्या बवाना या भागात राहणारा. पुढे त्याने आपलं नाव नीरज बवाना करून घेतलं. त्याच्यावर सध्या खून, हत्या, जमीनी बळकावणे असे तब्बल ५० गुन्हे दाखल आहेत. बवाना सध्या या गुन्हामुळे जेलची हवा खात असला तरी त्याचा मोठा समर्थक वर्ग सध्या सक्रीय असल्याचं या धमकीतून दिसतंय.

सिद्धू मोसेवाला आणि नीरज बवाना
सिद्धू मोसेवाला आणि नीरज बवानासकाळ

तसं बघितलं तर सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे मोठे कनेक्शन आहे. यासाठी बंबिहा, बिश्नोई आणि बवाना या गँगचे कनेक्शन बघावे लागेल. बंबिहा आणि बिश्नोई गँगचा ३६ चा आकडा होता. बंबिहा गँगमध्ये नीरज बवाना, गुरूग्रामचा कौशल चौधरी आणि दिल्लीचा सुनील उर्फ टिल्लु ताजपुरिया यांचा सामावेश होता. यांचा दबदबा सुरू झाला तो कॉलेजला असताना. ताजपुरिया हा विद्यार्थी निवडणुकांसाठी उभा राहिला होता. त्याला विरोधी म्हणून जितेंद्र मान उर्फ गोगी हा होता. निवडणुकांदरम्यान त्यांच्यात जोरदार गँगवार झाले. त्यानंतर ते दोघे जेलमध्ये गेले पण गोळीबार सुरूच राहिला.

पुढे २०१६ मध्ये पोलीस गोगीला घेऊन जात असताना त्याच्या गँगने पोलिसांवर मिरची पावडर टाकून त्याची सुटका करवून घेतली. पुढे बंबिहा याने जेलमध्ये असलेल्या नीरज बवाना सोबत हातमिळवणी केली. पुढे २०२० मध्ये पोलिसांनी गोगीला पकडलं आणि पुढे २०२१ मध्ये त्याचा एनकाऊंटर करण्यात आला.

लॉरेंस बिश्नोई, सिद्धू मोसेवाला, बवाना
लॉरेंस बिश्नोई, सिद्धू मोसेवाला, बवानासकाळ

आता बंबिहा गँगचा सूत्रधार आहे नीरज बवाना आणि त्याच्या विरोधात आहे लॉरेंस बिश्नोईची गँग. नीरज बवाना हा एकेकाळी सुरेंद्र मलिक ऊर्फ नीतू डबोडियाचा उजवा हात होता. नीतू तुरुंगात गेल्यावर नीरज हफ्ते वसूल करत असे. पुढे नीरजने नीतूला पैसे देणे बंद केले आणि स्वतःची टोळी तयार केली. नीतूने 2012 मध्ये नीरजचा जवळचा सहकारी अजय उर्फ​ सोनू दादाची हत्या केली होती. पुढे 2013 मध्ये स्पेशल सेलने केलेल्या चकमकीत नीतूचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विक्रम उर्फ पारस उर्फ गोल्डीने नीतू टोळीचा ताबा घेतला.

पुढे गुन्ह्याचा काळा अध्याय नीरजच्या कुंडलीशी जोडत राहिला आणि 2015 मध्ये नीरज पोलिसांच्या हाती लागला पण गोळ्या थांबल्या नाहीत. खूनाचे गुन्हेही थांबले नाहीत. तेव्हापासूनच गोल्डी आणि बवाना यांच्यामध्ये वैर कायम आहे. गँगस्टार नीरज बवानालाही तिहारमध्ये विलासी जीवन हवे आहे. मात्र, आता 2 दिवसांत सूड उगवण्याच्या धमकीने आणखी एका गँगवारला पुन्हा आमंत्रण मिळालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com