Amit Shah : अमित शाहांच्या उपस्थितीत आसाम सरकार आणि दिमासा आर्मीत शांतता करार

Muslim Reservation Amit Shah
Muslim Reservation Amit Shahesakal

Amit Shah in Assam : दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी हा बंडखोर समूह आणि आसाम सरकार यांच्यामध्ये शांती करार झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शांतता करारावर स्वाक्षरी झाली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आता राज्यामध्ये कोणताही आदिवासी बंडखोर समूह अथवा संघटन नाही. हे संघटन आता मुख्य प्रवाहात सहभागी झालेलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

अमित शाह पुढे म्हणाले की, आसाममधले सर्व विवाद आणि हिंसा या करारामुळे संपुष्टात येणार आहे. हातात हत्यार घेऊन, संघटन करणारा आणि जंगलात राहणारा एकही समूह आता आसाममध्ये असणार नाही. आज दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) आणि दिमासा पीपल्स सुप्रीम काऊन्सिल (डीपीएससी) सोबत आसाम सरकारने केलेल्या करारामुळे सर्व समूह मुख्य प्रवाहात आलेले आहेत.

माझ्यासाठी आनंदाची बाब- अमित शाह

माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की, दिमासा पिपुल्स सुप्रीम काऊन्सिल आणि दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी यांनी हिंसा संपवून दिमासाच्या लोकांच्या हितासाठी हा त्रिपक्षीय करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतमुक्त, हिंसामुक्त आणि विकासयुक्त समाजाची कल्पना देशासमोर मांडली आहे. गृह मंत्रालय मोदींच्या नेतृत्वामध्ये त्या दिशेने काम करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com