esakal | जगभरात तिसऱ्या लाटेची चिन्हं दिसू लागलीत; केंद्राचा भारतीयांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

जगभरात तिसऱ्या लाटेची चिन्हं दिसू लागलीत; केंद्राचा भारतीयांना इशारा

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : जगभरातील काही भागांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं आधीच दिसू लागली आहेत. कारण जगभरात प्रतिदिन सुमारे ३.९ लाख नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी दिली. त्याचबरोबर भारतीयांनी कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहनही केलं.

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबतच्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. पॉल म्हणाले, "दुसऱ्या लाटेमध्ये जगभरात जवळपास नऊ लाख नवीन संसर्गबाधितांची नोंद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच सांगितलं होतं की, आपल्याला तिसऱ्या लाटेवर लक्ष केंद्रीत करायला हवं. या टप्प्यावर आपण निष्काळजीपणा करणं आपल्याला महागात पडू शकतं त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही."

हेही वाचा: ऑगस्टमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार; आरोग्य मंत्र्यालयाची ग्वाही

याच पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, "५ मे ते ११ मे या काळात ३,८७,०२९ केसेस कमी झाल्या होत्या. तर ७ जुलै ते १३ जुलै या कालावधीत केवळ ४०,८४१ केसेसमध्ये घट झाली आहे." भारतीयांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याची त्यांनी यावेळी नोंद घेतली.

लस जातेय वाया, मेडिकलचा वेस्टचा प्रश्न

देशातील अनेक भागात लसींचा तुटवडा भासत असल्याबाबत डॉ. पॉल यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर याबाबत सर्वकाही राज्य सरकारांशी सहकार्याने सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मेडिकल वेस्टबाबत काळजी घेत जातली नसल्याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. याबाबत राज्य सरकारांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

loading image