

पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा
esakal
Sikandar Shaikh Punjab Police : पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला (Sikandar Shaikh) अखेर जामीन मंजूर झाला आहे. पंजाबमधील शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात अटकेनंतर देशभरातील कुस्ती वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, शेखच्या नावावर कोणताही गुन्हा नसल्याचे आणि तो देशातील आघाडीचा खेळाडू असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. कुस्ती क्षेत्रात सिकंदर शेखला पुन्हा संधी मिळणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.