'तिचे' सर सलामत तो पगड़ी पचास...

Manjit Singh
Manjit Singh

श्रीनगरः राज्यमार्गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही जण व्हिडिओ. पण, या गर्दीला पाहून एक युवक  पुढे सरसावतो अन् डोक्यावरील पगडी काढून त्याची पट्टी करून महिलेच्या डोक्याला गुंढाळतो. यामुळे रक्तस्त्राव थांबतो अन् महिलेचा जीव वाचतो. डोक्यावरील पगडी काढून पट्टी करणाऱया शीख युवकाचे नाव आहे मंजित सिंह.

मंजित सिंह याचा अपघातग्रस्त महिलेसोबतचा व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स मंजित सिंहवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सर सलामत तो पगडी पचास... अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत. शीख संस्कृतीमध्ये पगडीला विशेष महत्व आहे. पगडीशिवाय शीख बांधव अपूर्णच. परंतु, शीख संस्कृतीत महत्वाची असलेल्या पगडीमुळे एक महिलेला जीवदान मिळाले आहे.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्गावर असलेल्या अवंतीपोरा येथे ट्रकने महिलेला जोरात धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. परंतु, महिला गंभीर जखमी झाली होती. रक्ताच्या थोराळ्यात रस्त्याच्या बाजूला पडलेल्या महिलेच्या मदतीला कोणीही येत नव्हते. अनेकजण केवळ छायाचित्रे व व्हिडिओ काढण्यामध्येत व्यस्त होते. यावेळी मंजीत पुढे आला अन् त्याने आपली पगडी काढून महिलेच्या जखमेवर बांधली. यामुळे रक्तस्राव थांबवला. यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. योग्यवेळी महिलेला रुग्णालयात दाखल केल्यामुळे अपघातग्रस्त महिलेचा जीव वाचला आहे. डॉक्टरांनी मंजीतचे कौतूक केले आहे.

मंजीत म्हणाला, 'रस्त्याच्या कडेला गर्दी झाली होती. गर्दी पाहून मी काय झाले पाहण्यासाठी तिथे गेलो. त्यावेळी एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. अपघाताचे दृष्य पाहून मला रहावले नाही. पगडी आमच्या धर्माची आस्था आणि शान आहे. पण त्या महिलेचा मृत्यू झाला असता तर ही आस्था आणि शान राहिली असती का? गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आपले सर्वस्व बहाल करण्याची शिक्षा गुरूंनी दिली आहे. एका महिलेचा जीव वाचल्याचे मोठे समाधान आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com