Sikkim Flash Floods: सिक्कीमच्या भीषण पुरात 8 जवानांसह 22 ठार, 3000 पर्यटक अडकले

भारतीय लष्करानं बेपत्ता नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केली हेल्पलाईन
Sikkim Flood
Sikkim Flood

Sikkim Flash Floods: सिक्कीमध्ये बुधवारी ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या भीषण पुरात आत्तापर्यंत २२ जण ठार झाले असून यात ८ जवानांचाही समावेश आहे, तर १०२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्याचबरोबर तब्बल ३,००० पर्यटक अनेक मार्ग बंद झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडले आहेत. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Sikkim flash floods 22 dead including 8 jawans and 3000 tourists stranded)

तीस्ता नदीवर चुंगथांग इथं धरण उभारण्यात येत असून याच्या तिसऱ्या टप्प्यातलं काम सुरु होतं. यासाठी १२ ते १४ कामगार काम करत होते. या सर्वजण तिथल्या एका बोगद्यात अडकून पडले आहेत. त्याचबरोबर मांगण जिल्ह्यातील चुंगथांग, डिग्चू, गंगटोक जिल्ह्यातील सिंगताम आणि पाकयोंग जिल्ह्यातील रांगपो इथं २६ लोक जखमी तर बारडांग इथं २३ जवान अद्यापही बेपत्ता आहेत. (Marathi Tajya Batmya)

Sikkim Flood
Sikkim Rain News : सिक्कीममध्ये ढगफुटी; आठ जवान मृत्युमुखी; २३ बेपत्ता

सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, लोनाक तलावावर मंगळवारी रात्री १०.४२ वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यानंतर या तलावातील पाण्याला मोठ्या प्रमाणावर उधाण आलं, त्यानंतर हे पाणी थेट तीस्ता नदीच्या पात्रात शिरलं. यामुळं तीस्ता नदीच्या पाण्यानं पात्र सोडून वाहू लागली, त्यामुळं एकूणच भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. (Latest Marathi News)

Sikkim Flood
Nanded Hospital Death: मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर

या पुराच्या पाण्यामुळं हायवे देखील वाहून गेला आहे. यानंतर राज्य सरकारनं आणखी तीन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याचं येणार आहे. सध्या एनडीआरएफची एक टीम रांगपो आणि सिंगतम शहरात तैनात आहेत. या एनडीआरएफच्या टीमनं राज्यातील विविध भागात सुमारे ३००० पर्यटक अडकून पडल्याचं निश्चित केलं आहे.

आर्मीकडून हेल्पलाईन जाहीर

दरम्यान, भारतीय लष्कराकडून या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसाठी तीन हेल्पलाईन जाहीर केल्या आहेत.

Army Helpline No for North Sikkim - 8750887741

Army Helpline for East Sikkim - 8756991895

Army Helpline for missing soldiers - 7588302011

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com