इस्राईलच्या "आयडीसी' विद्यापीठाशी "एसआयएलसी'चा शैक्षणिक करार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि "स्टार्टअप' कंपन्यांना चालना देण्यासाठी "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने (एसआयएलसी) इस्राईलमधील आयडीसी हर्जेलिया या नामवंत विद्यापीठासमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला. 

नवी दिल्ली - उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि "स्टार्टअप' कंपन्यांना चालना देण्यासाठी "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने (एसआयएलसी) इस्राईलमधील आयडीसी हर्जेलिया या नामवंत विद्यापीठासमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला. 

नवी दिल्लीत ताज पॅलेसमध्ये आयडीसी विद्यापीठाच्या "झेल प्रोग्रॅम'अंतर्गत हा करार झाला. इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष रूवेन रिवलिन यांच्या उपस्थितीत "सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि "आयडीसी'चे अध्यक्ष राइशमन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. वेद प्रकाश, आयडीसी विद्यापीठाचे एरिक झिमरमन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

  कुशल मनुष्यबळ आणि संशोधन आणि विकास या क्षेत्रांत सर्वांत जास्त खर्च करणारा देश म्हणून इस्राईलची ओळख आहे. या देशात सर्वाधिक "स्टार्टअप' कंपन्या कार्यरत आहेत. या करारामुळे "स्टार्टअप'च्या माध्यमातून नवे उद्योजक घडविण्याचे मोठे दालन खुले झाले आहे. आयडीसी विद्यापीठाने आतापर्यंत अनेक नामवंत उद्योजक घडविले आहेत. या विद्यापीठाचा "झेल प्रोग्रॅम' हा खास उद्योजकांसाठी आहे. याअंतर्गत केलेल्या करारामुळे नव्याने उद्योजकतेकडे वळणाऱ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या कराराच्या माध्यमातून एसआयएलसी आणि आयडीसी विद्यापीठ यांच्या समन्वयातून आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जातील. तसेच, उद्योजकांसाठी आणि "स्टार्टअप'ला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या वर्षात एसआयएलसीमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 

Web Title: Silc of the educational agreement