दिल्ली सरकारकडून सिंधू, साक्षीला बक्षीस जाहीर

वृत्तसंस्था
शनिवार, 20 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

रिओ ऑलिंपिकमध्ये या दोघींनाच आतापर्यंत पदक मिळविण्यात यश आलेले आहे. पी. व्ही. सिंधूला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे तिला रौप्यपदक मिळाले. तर, साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले. या दोघींच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. आता आम आदमी पक्षाची (आप) सत्ता असलेल्या दिल्ली सरकारकडून दोघींना रोख रक्कमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

साक्षी मलिकचे वडील दिल्ली परिवहन मंडळात नोकरीस असून, त्यांनाही बढती देण्यात येणार असल्याचे, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दोघींचे अभिनंदन केले आहे. 

Web Title: Sindhu Delhi government, public witness gift