
सिंगापूर : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंगापूरला गेलेल्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने आज येथील गृहमंत्र्यांची भेट घेत दहशतवादाबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाच्या सर्व प्रकारांना आमचा विरोध असून या लढाईत आम्ही भारताबरोबर आहोत, असे सिंगापूरने यावेळी जाहीर केले. भारताबरोबरील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचेही सिंगापूरच्या गृहमंत्र्यांनी सांगितले.