Sonu Nigam Love Story : वयात १५ वर्षांचा फरक, सोनू निगमची बायको सौंदर्यात बॉलीवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Nigam Love Story

Sonu Nigam Love Story : वयात १५ वर्षांचा फरक, सोनू निगमची बायको सौंदर्यात बॉलीवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे

Sonu Nigam Love Story : बॉलीवुडचे प्रसिद्ध सिंगर सोनू निगम त्यांच्या सुमधूर आवाजासाठी आणि सदाबहार गीतांसाठी प्रसिद्ध आहे. खूप काळापासून हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले अधिराज्य गाजवणारे सोनू निगम यांनी आपल्या गोड आवाजाने प्रत्येकाचं मग जिंकलंं.

सोनू निगम (Sonu Nigam) यांची प्रोफेशनल लाइफ नेहमी चर्चेचा विषय असते पण खूप कमी लोक आहेत ज्यांना त्यांच्या पर्सनल लाइफविषयी माहिती असावं. आज आम्ही तुम्हाला त्यांची लव लाइफ आणि पत्नीविषयी सांगणार आहोत. ( singer Sonu Nigam spouse wife madhurima nigam life story love story)

सोनू निगमची लव्हस्टोरी

सोनू निगमनी अनेक हिट गाने दिले जे आजही सदाबहार आहे. सोनूची पत्नीचं नाव मधुरिमा असून त्या मात्र नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहल्या. सोनू निगम आणि मधुरिमा यांची जोडीला लोक आयडिअल कपल मानतात.

 सोनू आणि मधुरिमा यांची पहिली भेट एका प्रोग्रामदरम्यान झाली होती. या भेटीनंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर विवाह केला.

कोण आहे मधूरिमा ?

सोनु यांची पत्नी मधुरिमा इतकी सुंदर आहे की ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. विशेष म्हणजे मधुरिमा सोनू निगम पेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. मधुरिमा यांंचा स्वत:चा काउचर ब्रांड आहे. ‘मधुरिमा निगम’ नावाने हा ब्रॅंड ओळखला जातो. सोनू आणि मधूरिमा यांचा एक मुलगा सुद्धा आहे. मुलाचं नाव निवान आहे.