esakal | शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी हात-पाय तोडून बॅरिकेट्सला लटकवला तरुणाचा मृतदेह I Singhu Border
sakal

बोलून बातमी शोधा

Kundali Police
सिंघू सीमेवर जिथं शेतकरी आंदोलन करत आहेत, तिथं एका तरुणाच्या निर्घृण हत्येचं प्रकरण समोर आलंय.

शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी हात-पाय तोडून बॅरिकेट्सला लटकवला तरुणाचा मृतदेह

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

दिल्ली : सिंघू सीमेवर (Singhu Border) जिथं शेतकरी आंदोलन करत आहेत, तिथं एका तरुणाच्या निर्घृण हत्येचं प्रकरण समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणाचा हात कापून मृतदेह बॅरिकेट्सवर लटकवण्यात आलाय. हा मृतदेह सापडल्यानंतर सिंघू सीमेवर तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. सुरुवातीला आंदोलक पोलिसांना मुख्य स्टेजजवळ जाऊ देत नव्हते. मात्र, नंतर कुंडली पोलिसांनी (Kundali Police) हा मृतदेह खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय. या तरुणाची ओळख पटली असून लखबीर सिंह (Lakhbir Singh) असं त्याचं नाव आहे. हा तरुण तरन तारण जिल्ह्यातील चीमा खुर्द गावात मजूर म्हणून काम करत होता. तो अनुसूचित जातीचा असल्याचे हरियाणा पोलिसांनी आपल्या FRI मध्ये म्हटलंय.

या तरुणाचा मृतदेह सकाळी सिंघू सीमेवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ लटकलेला आढळला. त्याचे वय साधारण 35 वर्षांच्या जवळपास आहे. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा देखील आढळल्या आहेत. या मृत झालेल्या तरुणाचा हात मनगटातून कापला गेलाय. या हत्येचा आरोप निहंगोंवर केला जात आहे. मात्र, अद्याप या खुनाचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा: भारत सहाव्यांदा बनला UNHRC चा सदस्य; मिळाली 'इतकी' मतं

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात 25 नोव्हेंबर 2020 पासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली-हरियाणाच्या सिंघू व टिकरी सीमा, दिल्ली-उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला 9 महिन्यांहून अधिक काळ उलटला गेला असून शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठकाही झाल्या. मात्र, आत्तापर्यंत यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

हेही वाचा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दारु पिऊन 10 टक्के लाच घेतात

loading image
go to top