Gyanesh Kumar
esakal
एसआयआर प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दमर्यान, एसआयआर संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुानवणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान SIR संदर्भात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. या प्रतिज्ञापत्रात SIRशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सामूहिकपणे घेतल्याचं आयोगाने म्हटलं आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सर्वसंमतीने मंजुरी दिल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. मात्र, आयोगाच्या या स्पष्टीकरणानंतरही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत.