

The Election Commission of India has seen significant administrative changes during the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls, with multiple Chief Electoral Officers transferred across states and Union Territories in 2025 and 2026
esakal
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (SIR) देशभरात राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू असताना, निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे. २०२५ आणि २०२६ या कालावधीत देशातील सुमारे १८ ते २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या सुमारे २० महिन्यांत हे बदल झाले आहेत. कमी कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणे ही निवडणूक प्रशासनातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.