एका पक्षाला सत्तेत आणण्यासाठी १३ कोटी मतदारांची नावे हटवली? सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा दावा, देशात खळबळ!

Former Supreme Court Judge V. Gopala Gowda Criticizes Election Commission Over SIR : एसआयआर प्रक्रियेतून १३ कोटी मतदारांची नावे हटवून एका राजकीय पक्षाला फायदा पोहोचवल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. गोपाला गौडा यांनी निवडणूक आयोगावर केला.
Former Supreme Court Judge V. Gopala Gowda

Former Supreme Court Judge V. Gopala Gowda

esakal

Updated on: 

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. गोपाला गौडा यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. देशभरातील मतदार यादीतून १३ कोटी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे हटवून एका राजकीय पक्षाला सत्तेत आणण्यास मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. ही प्रक्रिया देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारी असून निवडणूक आयोग असंवैधानिक आणि अलोकशाही पद्धतीने काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

Loading content, please wait...