PSI होता आलं नव्हतं, आता आयपीएस झालाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PSI होता आलं नव्हतं, आता आयपीएस झालाय
PSI होता आलं नव्हतं, आता आयपीएस झालाय

PSI होता आलं नव्हतं, आता आयपीएस झालाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिरिसेट्टी संकीर्थने तीन वर्षांपूर्वी 800 मीटर शर्यत काही सेकंदांनी गमावली. तेव्हा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न धुळीला मिळाले, असेच त्याला वाटले.

पण संकीर्थने शु्क्रवारी हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्यांच्या 'दीक्षांत परेड'मध्ये 132 सहकारी IPS प्रशिक्षणार्थींसोबत संचलन केले आहे. तीन वर्षांपूर्वी धावण्यात अपयशी ठरल्याने पोलिस सेवेत येण्याचे त्याचे स्वप्न तो पूर्ण करू शकला नव्हता. आता मात्र तो आयपीएस झाला आहे. तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील बेल्लमपल्ली गावातील रहिवासी असलेल्या इलेक्ट्रिशियनचा संकीर्थ हा मुलगा आहे. त्याने पोलीस होण्यासाठी यापूर्वी राज्य परीक्षा उत्तीर्ण केली होती.मला 800 मीटरची शर्यत 160 सेकंदात पूर्ण करायची होती. पण मी ती पूर्ण करण्यात अपयशी ठरलो होतो, असे, संकीर्थने सांगितले.

हेही वाचा: दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC

आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील हे त्याच्या लक्षात आले. एकीकडे अभ्यास सुरू होताच पम वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्याने सरकारच्या प्रमुख जलप्रकल्प मिशन भगीरथमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली.

मी सकाळी 7.30 पर्यंत ऑफिसला जायचो आणि UPSC ची तयारी करायचो. माझे खरे काम संध्याकाळी असायचे. मला डेस्कचे काम देण्यात आले. त्यामुळे मी पूर्ण दिवसाची तयारी करून वेळेचे व्यवस्थापन करायचो, असे संकीर्थ सांगतो.

फिटनेसवर काम करत असताना संकीर्थने UPSC परीक्षा देण्यास सुरुवात केली. पण तो त्यात पास झाला नाही. त्याने हार मानली नाही. प्रयत्न चालूच ठेवले.

पाचव्या प्रयत्नात मी UPSC उत्तीर्ण केले आणि SVP राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) मधील पोलिस प्रशिक्षणादरम्यान खेळात चांगली कामगिरी केली. काही पदकेही जिंकली,” असे संकीर्थ सांगतो. त्याची रँक 330 आहे. यूपीएससी परीक्षेदरम्यान संकीर्थने उस्मानिया विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण केले आणि आता त्याला तेलंगणा केडर देण्यात आले आहे.
मला आयपीएस अधिकारी म्हणून पाहण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. मी त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद आहे, असे संकीर्थ सांगतो.
संकीर्थ आणि त्याच्या सहकारी IPS प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून फ्रान्सला पाठवले जाणार आहे.

loading image
go to top