
उत्तर प्रदेशातील बांदा इथं एक धक्कादायक अशी घटना घडलीय. १९ वर्षीय तरुणीने हातावर सुसाइड नोट लिहून जीवन संपवलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी तरुणीच्या चुलत भावाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. यानंतर तरुणीने मला अभिषेकजवळ जायचंय म्हणत गळफास घेतला.