Sitapur Shocking Incident
esakal
एका ३५ वर्षीय महिलेने प्रेमप्रकरणातून चक्क पोलीस ठाण्यातच स्वत: हाताची नस कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशाच्या सीतापूरमध्येही ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पुजा मिश्रा असं या महिलेचं नाव आहे, तर आलोक असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.