तेलगळतीमुळे कारला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू; दोघे गंभीर

six die as car catches fire in andhra s chittoor andra pradesh
six die as car catches fire in andhra s chittoor andra pradeshSakal

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, कारमध्ये तेलाची गळती झाल्याने कारला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये एकूण 8 जण प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. चंद्रगिरी झोनजवळ पुथलपट्टू-नौदुपेटा रस्त्यावर कारचा अपघात झाला. इन्स्पेक्टर बीव्ही श्रीनिवास यांनी सांगितले की, तेलगळतीमुळे कारला आग लागली. कारमध्ये एकूण आठ जण होते.आग इतकी वेगाने पसरली की कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित तीन जणांना गंभीररित्या जळलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे आणखी एकाचा मृत्यू झाला. तर इतर 2 जणांवर उपचार सुरू आहेत.

चित्तूर जिल्ह्यातून एकूण आठ जण कारमध्ये प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेल्या कारने वळण घेत दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे तेलगळती होऊन पुथलपट्टू-नायडुपेट रस्त्यावरील चंद्रगिरी झोनमधील ऐतेपल्ली येथे कारला आग लागली. या भीषण आगीत पाच जणांचा पेटलेल्या कारमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. इतर तिघांना गंभीर जखमी अवस्थेत तिरुपती येथील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला,असे श्रीनिवास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com