

Six Friends Lose Lives In Brutal Road Mishap
Esakal
Six Friends Killed In Horrific Car Accident: भरधाव कार ट्रेलरला धडकून झालेल्या भीषण अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सर्वजण एका लग्न समारंभातून परतत होते. राजस्थानमधील दौसा इथं मंगळवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. एनएच २ वर कैलाई गावाजवळ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार अपघातात मृत्यू झालेले सर्व तरुण एकाच गावातले होते. कालाखो गावातून ते आभानेरी इथं एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न आटोपून परतताना त्यांची कार जयपूर आग्रा महामार्गावर भरधाव वेगात होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.